बुद्धिबळ सॉल्व्हिंग: विचार करण्याची कला शिकवणारी स्पर्धा
16/10/2026 - इचलकरंजीत बुद्धिबळाच्या एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देणारा दुसरा केन बुद्धिबळ सॉल्व्हिंग कप २०२६ सज्ज आहे! केवळ दीड ते अडीच तासांत एकाग्रता, कल्पकता आणि सखोल विचारशक्तीला आव्हान देणारी ही स्पर्धा अनुभवी खेळाडूंसोबतच नवोदितांनाही आपली बुद्धिमत्ता आजमावण्याची संधी देते. कारण बुद्धिबळ म्हणजे केवळ जिंकणं-हरणं नव्हे, तर योग्य पद्धतीने विचार करायला शिकणं!